लहान भावाची चाकूने भोसकून हत्या...

Foto
 घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये न दिल्याने मोठ्या भावाने वकील असलेल्या लहान भावाच्या छातीत सुरा भोसकून हत्या केल्याची खळबळ जनक घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जवाहरनगर  भागात घडली.हत्या केल्यानंतर मारेकरी भाऊ पसार झाला.
सुर्यप्रताप ठाकूर वय-53 वर्ष (रा.परितोष विहार, जवाहरनगर) असे मृत वकिलांचे नाव आहे.तर वेद प्रकाश ठाकूर वय-56 (रा.पैठण) असे  भावाची हत्या करून फरार झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.

या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेली अधिक माहिती अशी की,

सूर्य प्रताप आणि वेद प्रकाश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत वेद प्रकाश हा पैठण येथे राहतो तर मृत सूर्यप्रताप हे औरंगाबाद येथील जवाहर नगर या भागात राहतात ते एका कंपनीमध्ये लीगला ॲडव्हायझर म्हणून काम करतात असं काय साडे आठ वाजेच्या सुमारास मोठा भाऊ वेद प्रकाश हा पैठण औरंगाबाद झाला दोघेही घरात बसले यावेळी वेदप्रकाश ने घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता आहे मला दे असे लहान भाऊ कडे पैशाची मागणी केली. दरम्यान चहा साठी घरातील दूध संपल्याने सूर्य प्रताप यांच्या पत्नी अशा ठाकूर या दूध आणण्याससाठी तिसऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे गेली. दरम्यान सुर्यप्रताप यांच्याकडे पैशे नसल्याने त्यांनी पैशे देण्यास नकार देतात  दोघांमध्ये वाद निर्माण झाला राग अनावर झाल्याने  वेदप्रकाश ने सुर्यप्रतापवर धारदार सुऱ्याने  सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडताच वेदप्रकाश ने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून घरातील भावाचे कपडे घालून घराची कडी लावून पसार झाला.  काम करणाऱ्या बाईने वेदप्रकाश ला पायरीवरून पळताना पाहिले तिला संशय आल्याने अशा ठाकूर यांना सांगितले दोघींनि घरात जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात सुर्यप्रताप जमिनीवर पडलेले होते त्यांना  तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.पोलीस मारेकरी भाऊ चा शोध घेत आहे..