घायल है तेरा दिवाना...भाई वाह...दिवान्याची कोठडीत निघाली आह...

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः स्पोर्ट बाईक...उडणारे लांबसडक केस...अन धूम स्टाईल वेग...अन देख जनाबी...हे कॅटरिना कैफचे सुपरहिट गाणे...तरूणी दिसताच कर्णकर्कश हॉर्न वाजवूत चमकोगिरी. बहाद्दराने एमजीएम कॅम्पसमध्ये रिल केले अन इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. हे रिल पोलिसांपर्यंत पोहोचताच तरूणींना आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या या दिवाण्याचा शोध घेतला अन प्रसाद देत घायल केले. त्याने मग कोठडीतूनच हात जोडून माफी मागितली. 

चर्चा होतेय ती पोलिसांच्या कारवाईची...

शेख समीर शेख सलीम असे या दिवान्याचे नाव. एमजीएम कॅम्पसमध्ये विद्यार्थीनी रस्त्याने जात असताना त्याने धूम स्टाईल स्पोर्ट बाईक चालवत रिल बनवले. कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवला, या आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थीनी दचकल्या अन घाबरून जोरात ओरडल्या. या बाईकचा आवाज एवढा होता की रस्त्यावरील प्रत्येकजण बाईकस्वाराकडे बघत होता. अन समीर स्टाईल मारत होता. ही रिल शुट करून त्याने प्लॅटफॉर्म चित्रपटातील सुपरहिट अफगाण जलेबी...मासूम फरेबी....घायल है तेरा दिवाना भाई वाह... हे कॅटरिना-सैफ अली खानचे गाणे त्यावर टाकले. या हिरोचे हे रिल काही वेळातच व्हायरल झाले. अन पोलिसांपर्यंत पोहोचले.

पोलिस आयुक्तांनी दिले आदेश...

एमजीएम कॅम्पसमध्ये केलेले हे रिल वादग्रस्त तर ठरलेच मात्र बाईकच्या आवाजाने आणि हॉर्नमुळे तरूणी घाबरल्या. हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सांगत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सदर बाईकस्वारावर कारवाईचे आदेश दिले. सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने शोध घेतला अन समीरला अटक केली. त्याच्यासोबत व्हिडीओ काढणाऱ्यालाही अटक करण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

कोठडीत माफीनामा...

बाईकवर हिरोगिरी करणाऱ्या समीरला कोठडीत टाकताच तो ताळ्यावर आला.पोलिसांचा प्रसाद मिळताच त्याची जणू आह निकली. कोठडीतच त्याने हात जोडत पोलिसांसमोर गयावया केल्या. माफी मागत त्याने यापुढे असे करणार नाही असे सांगितले. पोलिसांनी त्याचा कोठडीतला व्हिडीओ व्हायरल करीत त्याची उरली सुरली उतरवली.