जुन्या वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने छातीत, हातावर व मांडीवर सपासप वार करून त्याची हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पाणचक्की - परिसरातील हमजा हॉटेल येथे घडली. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपीविरुद्ध जवाहरनगर / बेगम पुरा हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
बेगमपुरा परिसरातील कृष्ण - गल्ली (कृष्ण मंदिराच्या पाठीम -ागे) येथील रहिवासी असलेला - यश हा तरुण ३० जुलै रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास पाणचक्की येथील हमजा कॅफे येथे नाश्ता करत होता. त्यावेळी
आरोपी अरबाज खान वाहेद खान (वय २५, रा. पाणचक्की) तेथे आला. त्याने जुन्या वादाचा राग मनात धरून यशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आपल्याजवळील आज मै तुझे जिंदा नही छोडूंगा, अशी धमकी देत अरबाजने चाकूने यशच्या थेट छातीत वार केला. यानंतर त्याने त्याच्या डाव्या हातावर आणि दोन्ही म  ांड्यांवर चाकूने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. ३१ जुलै रोजी मध्यरात्री पोलिसांत याप्रकणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions