औरंगाबाद: 19 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडीघेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सकाळी संग्रामनगर येथे घडली. तरुणाने आत्महत्या का केली हे स्पष्ठ होऊ शकले नाही.
सुरज गंगाधर भांडारे वय-19 (रा.सातारापरिसर,औरंगाबाद) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी सुरज हा संग्रामनगर येथील रेल्वे रुळाजवळील एका ओट्यावर बसला होता .त्याच्या हवभवावरून तो तणावात असल्याचे काही नागरिकांना जाणवले या बाबत नागरिकांनी एसपीओ गोरडे यांना माहिती दिली मात्र गोरडे हे पोहोचे पर्यंत समोरून रेल्वे येत होती.आपल्याला वाचविण्यासाठी नागरिक येत असल्याचे पाहून तरुणाने रेल्वेच्या दिशेने पळ काढला. आणि रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली.