संभाजीनगर, छत्रपती : : (सांजवार्ता ब्युरो) मराठवाड्यातील लाखो रुग्णांचा आधार असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रविवारी (ता. पाच) एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने धारदार कोयता घेऊन सर्जिकल इमारतीमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला.
घाटी रुग्णालयात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण
दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई
अपघात विभागात भांडण, मारामारीनंतर अनेकदा मोठे गट दाखल होतात. काही वेळा सुरक्षा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा नियम कडक करण्यात येणार असून, गोंधळ घालणाऱ्यांविरोधात थेट पोलिस कारवाई केली जाणार आहे.
66 घाटीमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण सुरक्षित वातावरणात उपचार घेईल. नुकतीच घडलेली घटना गंभीर असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे. क्यूआर कोड पास, डिजिटल नोंदणी आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून रुग्णालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवले जाईल. रुग्णसेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित करणे हाच या बदलांचा उद्देश आहे.
-डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय
ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात. याशिवाय मराठवाडा, खान्देश, विदर्भासह विविध भागांतून रुग्णांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक येत असतात. त्यामुळे रुग्णालयातील दाखल
गर्दी, अनधिकृत प्रवेश आणि सुरक्षेचे आव्हान वाढले आहे. आता या सर्वांवर नियंत्रणासाठी डिजिटल आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions