वीर हनुमानचा आदर्श युवकांनी घ्यावा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आजच्या युवकांमध्ये महाभारत आणि रामायण यांसारख्या महान ग्रंथांविषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. विशेषतः हनुमान यांच्या व्यक्तिमत्त्वातील बल, बुद्धिमत्ता आणि विनम्रता या गुणांमुळे युवक त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतात. आज वीर हनुमानजी यांचा आदर्श प्रत्येक युवकांनी घेतला पाहिजे. वीर हनुमान यांचे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी वीर हनुमाना अति बलवाना... असे सुमधुर आवाजात गीत गाऊन संपूर्ण परिसर भक्तिमय केला.
श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था आणि समन्वय परिवारातर्फे प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या पावन अमृतवाणीद्वारे प्रथमच तापडिया कासलीवाल प्रांगणात हनुमान कथेला शुक्रवारी (दि.१०) सुरुवात झाली. यावेळी प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे स्वागत करून भगवंतांनी आरती करून कथेला सुरुवात झाली. यावेळी महाराजांनी सांगितले की, धार्मिक आणि सांस्कृतिक अभ्यासकांच्या मते, हनुमानजी केवळ पराक्रमी नव्हते, तर ते अत्यंत ज्ञानी, कुशल संवादक आणि वाद सोडविण्यात पटाईत होते. श्रीराम यांच्याप्रती त्यांची निष्ठा
आणि कर्तव्यभावना हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. समाजात वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर कोणाचा अनादर का करू नये? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही विशेष गुण असतात. गणपती बुद्धीचे प्रतीक आहेत, तर हनुमानजी सेवा आणि शक्तीचे. त्यामुळे परस्पर आदर राखणे हीच खरी संस्कृती आहे.
युवकांना सगळ्यात जास्त महाभारत कथा प्रिय वाटते. त्यानंतर हनुमानजी हे देखील युवकांना अधिक भावतात. हनुमानजी यांच्यासारखे कोणी ज्ञानी नाहीत. हनुमानजीचे जे चिंतन करतात त्यांना कधीही यश मिळते. ते कधी आजारी पडत नाही, असे सांगून हनुमानजींच्या
स्वामी यांचे यादविदेव गिरीजी महाराज
'वीर हनुमाना अति बलवाना'
हनुमान कथेच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. यावेळी वीर हनुमाना अति बलवाना, राम नाम रसियो रे, मेरे मन बसियो रे... या सुमधुर गीतांनी संपूर्ण भाविकांनी टाळ्यांचा गजर केला. यावेळी टाळ्याच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाला. यावेळी हनुमान की जय... असाही जयघोष करण्यात आला.
शौर्याची अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था आणि समन्वय परीवार छत्रपती संभाजीनगरच्या वतीने १२ एप्रिलपर्यंत कथा चालणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या कथेला आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष भिकमचंद मल, दिलीप सोनी, सीए मदनलाल जाजू, राधेश्याम करवा, अॅड. ओमप्रकाश साबू, अॅड. अनिल सोनी, बी. एन. राठी, अॅड. सोमनाथ लड्ढा, गणेश दरक, सुनील मालाणी, राजेंद्र राठी, रेखा राठी, संगीता चेचाणी, रमेश धूत, गोपाल अजमेरा, ओमप्रकाश काबरा, सुभाष लाहोटी, पद्मा तापडिया, सीए सत्यनारायण जाजू, चंद्रप्रकाश साबु, जगदिश सारडा, शिवप्रसाद तोतला, पंडित विजयकुमार पल्लोड, संजय मंत्री, भुषण मालपाणी, निखील करवा, सीए कृष्णा राठी, संजय मंत्री आदींच्या वतीने करण्यात आले आहे.