मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधुंनी मुंबईत आज मोर्चाची घोषणा केली होती परंतु त्याआधीच मागण्या मान्य झाल्याने या मोर्चाचे रुपांतर जल्लोष मोर्चात झाले.या जल्लोषमोर्चाला देखील मोठ्या प्रमाणावरती तरूणाईची प्रचंड गर्दी उसळली होती. सर्वांच्या हातात तिरंगा असल्याने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने फुलून आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रूणाईचे आभिनंदन केले.
तरूणाई जमलेल्या ठिकाणी ए आर रहमानचं वंदे मातरम गाणं लागलं, गाणी ऐकू येताच हातातील तिरंगा उंचावून तरूणाई त्यावरती नाचू लागली. या सामान्य जनतेचा जल्लोष आता शिवाजी पार्क मैदानात होताना पाहायला मिळतोय. अगदी बोलीभाषेतले बॅनर छान मोठे मोठे तयार केले आहेत. गंमत मधी हे वाक्य मागच्या वर्षभरापासून या देशाला, या राज्याला भुरळ घालतेय आणि ते वाक्य आताही पाहायला मिळतंय आपल्याला की मोठ मोठे गार केले गमंत मधी. अशा तर्हेने इंटरनेटवर असलेले मीम्स असतील, मेसेजिंग असेल, यामध्ये जे कन्वर्सेशन होतं, त्याचे हे सगळे पोस्टर या ठिकाणी झळकताहेत. देशाचा तिरंगा उंचवला जातोय अभिमानाने हा देशाचा तिरंगा जो आहे तो फडकवला जातोय. डिजिटल युगातली तरुण भाषा रस्त्यावर घेऊन लढताना पाहायला मिळतेय.
सावरकर मार्गावरचा हा संपूर्ण रस्ता भरून गेला आहे आणि फक्त इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर चालणार्या कमेंट्स आणि रिएक्शन्स, त्याच्यातून कंटेंट पाहायला मिळतेय. डिजिटल युगातली पहिली क्रांती जी आहे ती रस्त्यावर आलेली पाहायला मिळतेय. म्हणजे जो लढा इंस्टाग्रामवरून उभा राहिला, तोच थेट ग्राउंडवर आला आणि त्या लढ्याने बाजी मारली आणि थेट केंद्रातल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्याचा हा सगळा आनंद आणि विजयोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
या देशातल्या जेन-झी ने सरकारच्या झिंज्या उपटल्या : राज ठाकरे
जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे आंदोलनातून समजलं, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजलं आहे. मी संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. शिवतीर्थवर झालेल्या गर्दीसमोर अमित ठाकरे नतमस्तक झाले आहेत. मंचावर डोकं टेकवून त्यांनी तरुणाईला नमस्कार केला आहे.शिवतीर्थवरील जल्लोष सभेनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी बाल्कनीमधून तरुणाईला अभिवादन केलं. यावेळी शर्मिला आणि रश्मी ठाकरेसुद्धा तिथे उपस्थित होत्या. तर संजय राऊत यांच्याही चेहर्यावर आनंद पहायला मिळाला.
एका झुरळाने हुकुमशाहला नमवले : उद्धव ठाकरे
तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलं नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. या संघर्षात जात,पात, धर्म विसरून मी भारतीय म्हणत आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकुमशाहला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री, त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता देशाचं काम करायला सांगा. कारण अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत. पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. इथे देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नव्हे रस्ता मंत्री, ते इथेनॉलवर बोलत आहेत. हा पुढचा विषय नक्की आहे. ही ठिणगी आता पडली, देशभर वणवा पेटलाय. निवडणूक गेल्या खड्ड्यात. ही मने आता पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणे हे आपले काम आहे. आता हे भोंदुत्व स्वीकारणारे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. खरोखर तरुणांनी देशाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान लिहिले आहे. तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी केली जाईल. सत्ताधार्यांची मस्ती सहन करू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाही पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरेंच्या रॅलीला पाठिंबा जाहीर केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. काँग्रेस पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे.