जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३३ वर्षीय तरुणावर घरातून चाकू आणून जीवघेणा हल्ला केल्याची घटना चिकलठाणा परिसरातील संभाजी कॉलनी येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपीने त्याच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसानही केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन खुशालसिंग पठारे (वय ३३, रा. संभाजी कॉलनी, चिकलठाणा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपी दीपक जाधव (रा. संभाजी कॉलनी, चिकलठाणा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ८ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पवन पठारे हे आपल्या मोटारसायकलवर (क्र. चक २०ड ७५२९) बसून कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी आरोपी दीपक जाधव याने जुन्या भांडणाची कुरापत काढून पवन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने घरात जाऊन धारदार चाकू आणला आणि पवन यांच्या डाव्या बरगडीवर, खांद्यावर व उजव्या हातावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions