वैजापूर, (प्रतिनिधी) येथील कृषी महाविद्यालयासमोर भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. २५) एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली.
भगवान गणपत इंगळे असे मृताचे नाव आहे. खंडाळा ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ एच वरील कृषी महाविद्यालयासमोर वैजापूरकडून येणाऱ्या (एमएच २० जी झेड ००२५) आयशर व शिऊरकडून येणाऱ्या (एमएच २० एचडी २२६९) रायडर्स दुचाकीचे टायर फुटल्याने समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार भगवान गणपत इंगळे (२४, रा. शिरोडी औराळा ता. कन्नड) हा जागीच ठार झाला.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, दुचाकीचा वेग एवढा होता की, अपघातानंतर दुचाकीचा चुराडा झाला. भगवान इंगळेला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मत घोषीत केले.












