गंगापूर, (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वाळूज येथे युवासेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
यावेळी आंदोलकांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात तालुका प्रमुख अनिल जाधव, विधानसभा संपर्क प्रमुख राजू जाधव, उपतालुका प्रमुख अजीम सय्यद, मनोज शिंदे, अजय हिंगमिरे, मोसिन पटेल, विभाग प्रमुख सिद्धार्थ शिंदे, सतीश शिंदे, संदीप संगेकर, समीर पटेल, नकुल पवार, भरत जाधव, अरबाज शेख, गणेश काळे, गणेश चव्हाण, सूरज शिंदे, सचिन रोकडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









