जिल्हा परिषद पंचायत समिती निकाल : मिळाले अनपेक्षित यश

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) जिल्हा परिषदचे ८ गट व पंचायत समिती चे १६ गणासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी जाहीर झाले पंचायत समिती गणाच्या ७ जागा मिळवत शिवसेना शिंदे गट सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ २ जागा जिंकण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला ४ जागा मिळाल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांला १ जागेवर समाधान मानावे लागले. एक जागा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मिळाली तर एक जागा अपक्षाने जिंकली आहे. 

जिल्हा परिषद गटात शिवसेनेला ३ जागा मिळाल्या भाजपला १ जागा मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांला २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला १ जागा मिळाली. १ जागा अपक्षाला मिळाली आहे.