पैठण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद मुलींची शाळा पैठण येथे रविवारी वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मुख्याध्यापक अंकुश गाढे, मुखी पुंजाराम कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रम पैठण युनिट व बिडकीन सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गासोबत समरसता या पर्यावरण पूरक उपक्रमाच्या सहाव्या टप्प्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या जागेत ४०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात
आले.
सद्गुरु माता सुदिक्षा व निरंकारी राजपिता रमित यांच्या आशीर्वादाने देशभरात वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम राबविण्यात येतो देशात ६३० ठिकाणी एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात आला असून सुमारे दहा लाख रोपांची लागवड करण्यात आली.
पैठण येथील कार्यक्रमास मुखी पुंजाराम कोरडे, मुख्याध्यापक अंकुशराव बढे, सेवादलाचे संचालक बद्रीनाथ घाटे, वकील, शिक्षक वृंद तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शेवटी आभार अविनाश केथा यांनी मानले. प्रत्येक झाडाची तीन ते वर्ष नियमितपणे देखभाल करण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.













