जिल्हा परिषदेने केला आदर्श शिक्षकांचा सन्मान

Foto

जिल्हा परिषदेने केला आदर्श शिक्षकांचा सन्मान
१४ शाळांचाही गौरव : शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील तीन शिक्षक व एका विषय शिक्षकाला शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.५) जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे होते. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, शिक्षण सभापती अनिता मोठे, बांधकाम सभापती सचिन गरड, समाजकल्याण सभापती शिरसाट, उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, एसएससी बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, प्राथमिक उपस्थिती होती. कालपर्यंत जिल्ह्यातून केवळ शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांची प्रमुख चार शिक्षकांचीच पुरस्कारासाठी निवड झाल्याने शिक्षक संघटनांतून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाने ऐनवेळी कार्यक्रमात तालुकानिहाय नऊ विशेष शिक्षकांसह १४ शाळांचा गौरव केल्याने
या चार शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव
प्राथमिक विभागातून नंदू देशपांडे (शिवराई, ता. कन्नड), अनिल पोघे (पांगरी, ता. सिल्लोड) आणि सुयोग बोऱ्हाडे (पानव खुर्द, ता. वैजापूर) आणि विषय शिक्षक म्हणून संतोष पाखरे (पैठण) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सोबतच एनएमएमएस परीक्षेसह विविध उपक्रमांत यश मिळवलेल्या १४ शाळांचाही गौरव करण्यात आला.
शिक्षक संघटनांची नाराजी दूर झाल्याचे चित्र कार्यक्रमस्थळी दिसून आले. शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी प्रास्ताविक केले.
तालुकानिहाय शिक्षकांचाही सन्मान
तालुकानिहाय विशेष ९ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात संभाजीनगरचे सचिन मातेवार, पैठणचे शिवाजी राठोड, वैजापूरचे रमेश बागूल, सोयगावचे सुनील बावचे, कन्नडचे नितीन वाघ, खुलताबादचे
१४ शाळांचा सन्मान
एनएम एनएमएमएस परीक्षेत यश: निमगाव प्राथमिक शाळा वैजापूर, अंधारी प्राथमिक शाळा सिल्लोड, जि.प. शाळा सोयगाव, निलजगाव, वरवंडी तांडा-२, पैठण, केंद्रीय प्रा. शाळा सातारा, पीएमश्री जि.प. शाळा, गणोरी, केंद्रीय प्रा. शाळा ताजनापूर, जि.प. शाळा संजरपूर, जि.प. शाळा वासडी, जि.प. शाळा शरीफपूर, जि.प. शाळा अनाड अजिंठा. परसबाग उपक्रमात तृतीय : जळगाव मेटे शाळा, वडोदबाजार हनुमान वाडी शाळा निधोना (शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र), जि.प. शाळा केह-हाळा फुलंब्री (शिष्यवृत्ती परीक्षेत ३ विद्यार्थी पात्र).
राकेश खैरनार, सिल्लोडचे राजकुमार काळम, फुलंब्रीचे बाबासाहेब साळुंखे, तालुकानिहाय विशेष नऊ शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
गंगापूरच्या सुमती काळगे यांचा समावेश आहे. इंग्रजी शाळांतून जि.प. शाळेत अधिक संख्येने विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्या शाळांचाही सन्मान करण्यात आला. यात किनगाव, पाचलगाव, लांडेवस्ती, सारोळा, पीएमश्री तुर्काबाद, माळीवाडा आणि नागापूर या शाळांचा समावेश आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions