पराभवानंतर अनिल गोटेेंचा सणसणीत आरोप - भाजपने आयात केलेले बलात्काराचे आरोपी

Foto

धुळे-  गेले काही दिवस भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर सडकून टीका केली. शिवाय लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले. मात्र त्यांचे हे प्रयत्न भाजपच्या एकहाती विजयाने पाण्यात गेले आहेत. यावर अनिल गोटे यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे.

काय म्हणाले गोटे

१) हा विजय पैशांचा आहे भाजपने या निवडणुकात पाण्यासारखा पैसा वाटला

२) ईव्हीएम मध्ये सुद्धा घोटाळा भाजपने या निवडणुकात केला आहे.

३) हा विजय भाजपने आयात केलेल्या गुंड लोकांचा आहे

४) भाजपने आयात केलेल्या लोकांवर बलात्काराचे आरोप आहेत

५) माझ्यावर हल्ला भाजपने केला असूनते पुढे कोणावरही हल्ला करू शकतात

६) भाजप आता अटलजीप्रमोद महाजनगोपीनाथ मुंडे यांच्या काळातल्या भाजप सारखं राहिलेलं नाही

अशी प्रतिक्रिया आमदार अनिल गोटे यांनी पराभवानंतर दिली.