कर्ज मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजर विधवेला म्हणाला- ‘तू साडीचा व्यवसाय करते, पण मला तुला साडीशिवाय पाहायचे’

Foto

औरंगाबाद – कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे प्रकरण समोर आले आहे. सिडको एन-६ येथील युनियन बँक मॅनेजर नागनाथ जोंधळे यांच्याविरोधात ४३ वर्षिय पीडितेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

साडी विक्रीचा व्यवसाय करणारी ४३ वर्षिय पीडितेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे सात लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. पीडितेचा अर्ज मंजूर करुन निवड समितीने फाईल सिडको एन-६ बजरंग चौक येथील युनियन बँकेकडे पाठवली. बँक मॅनेजर नागनाथ जोंधळे यांनी १२ सप्टेंबर २०१८ रोजी पीडितेला फोन करुन बँकेत बोलावून घेतले. कर्ज मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. पीडितेने मी गरीब विधवा असल्याचे सांगत ऐवढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. यानंतर बँक मॅनेजरने महिलेला कार्यालयीन वेळ संपल्यानंतर भेटण्यास बोलावले आणि महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बँक मॅनेजर म्हणाला- छातीवरील साडीचा पदर खाली करुन बसत जा, राणी बनून ठेवतो

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेची कामकाजाची वेळ संपल्यानंतर पीडिता मॅनेजरला भेटण्यासाठी गेली. यावेळी मॅनेजरने पीडितेला लज्जा येईल अशा स्वरुपाच्या भाषेचा उपयोग केला. तक्रारीत म्हटले आहे, की बँक मॅनेजर म्हणाला की, माझ्यासमोर छातीवरील साडीचा पदर खाली करुन बसत जा. येथे मी जास्त काही बोलू शकत नाही. पण मला काय म्हणायचे आहे त्या भावना तू समजून घे. यावेळी बँक मॅनेजर डोळ्यावरील चष्माकाढून पीडितेकडे वाईट नजरेने पाहात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बँक मॅनेजरने लाखो रुपये देण्याचे दिले आमिष

पीडितेने बॅंक मॅनेजरचा शरीरसुखाचा प्रस्ताव नाकरल्यानंतर त्याने कर्ज प्रकरण मंजूर करण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पीडितेला पुन्हा बँकेत बोलावून घेतले. यावेळी पीडिता एका सहकाऱ्यासह त्याला भेटायला गेली. तेव्हा बँक मॅनेजरने पुन्हा विधवा पीडितेकडे वाईटनजरेने पाहात, मला तुला पूर्ण कपडे काढून बघण्याची इच्छा आहे. माझ्यासोबत राहिलीस तर सर्व दुःख विसरून जाशील. मी तुला राणी बनवून ठेवील.   

पीडितेने या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल मिनाक्षी भवरे करत आहेत.