भ्रष्टाचार प्रकरणी ७४ जळगावचे राम एरंडे यांचे सरपंच पद रद्द, अप्पर विभागीय आयुक्त यांचे आदेश

Foto

औरंगाबाद- ग्रूप ग्रामपंचायत ७४ जळगाव,खाम जळगाव,शहापुर मानेगाव येथील सरपंच राम कोंडीराम एरंडे हे २०१५ ते २०२० करीता घेण्यात आलेल्या निवडणूकीमधुन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यांची निवड झाली होती.निवड झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यासंबधिची तक्रार येथिल रहिवासी कल्याण सर्जेराव सुक्रे,अमोल नंदकिशोर सुक्रे,संतोष माणिकराव एरंडे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे केली होती. यावर कारवाईचा बडगा उचलत डाँ.विजकुमार फड विभागीय अप्पर आयुक्त - २ औरंगाबाद यांनी सरपंच राम कोंडीराम एरंडे यांचे सरपंच पद काढुन टाकण्यासंधीचे आदेश दिलेले आहेत.

एरंडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार केल्यासंबधिची तक्रार दाखल केली होती. येथिल रहिवासी कल्याण सर्जेराव सुक्रे,अमोल नंदकिशोर सुक्रे,संतोष माणिकराव एरंडे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१)  नुसार सरपंच पदावरून काढुन टाकावे म्हणुन अँड.शरद.व्हि.भागडे यांच्या मार्फत प्रकरण दाखल केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा चौकशी अहवाल मागवुन घेण्यात आला. चौकशीअंती ७४ जळगावचे सरपंच राम एरंडे यांनी मारोती इनाम जमीन गट.क्र.२५५ मध्ये शेततळे खोदुन नियमबाह्यरित्या शासनाचे अनुदान उचलने गट.क्र.२५८ मधिल ७६ आर इतकी जमीन असतांना ०१ हेक्टर ७६ आर इतकी जमीन करून ति आपल्या मुलाच्या नावे करणे,गट.नं.२ मधिल सरकारी गायराण ६०० चौ.फुट ,४१५ चौ.फुट  (०२ हे.२८ आर ) इतके क्षेञ नियमबाह्यरित्या महेंद्रमुनी कपाटे  यांच्या नावे बेकायदेशीररित्या करणे यांसह आदी भ्रष्टाचार केल्याप्रकरण डाँ.विजकुमार फड विभागीय अप्पर आयुक्त - २ औरंगाबाद यांनी सरपंच राम कोंडीराम एरंडे यांचे ग्रामपंचायत ७४ जळगाव ये पद काढुन टाकण्यासंधीचे आदेश दि.०७ डिसेंबर २०१८ रोजी आदेश पारीत केले.

सरपंच राम कोंडीराम एरंडे हे उर्वरीत कालावधीसाठी सरपंच म्हणुन निवडुन येण्यासाठी पाञ राहणार नाही. असा आदेश अप्पर विभागीय आयुक्त डाँ.विजयकुमार फड यांनी पारीत केलेला आहे. र्जदार कल्याण सर्जेराव सुक्रे,अमोल नंदकिशोर सुक्रे,संतोष माणिकराव एरंडे यांच्यातर्फे अँड.शरद व्हि.भागडे यांनी कामकाज पाहिले व त्यांना अँड.गणेश गोरे यांनी सहकार्य केले.