औरंगाबाद- एमजीएमच्या वसतिगृहात हत्या झालेल्या डॉ.आकांक्षा देशमुख या विद्यार्थीनीला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी कँडल मार्च काढण्यात आला. महाविद्यालयात हा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराला विद्यार्थ्यांनी वेढा घातला. मात्र प्रशासनातर्फे कोणीही आकांक्षाला श्रध्दांजली देण्यासाठी आले नाही. त्यामुळे विद्यार्थीनीच्या जिवापेक्षा संस्थेचा वर्धापन दिनाचा सोहळा प्रशासनाला जास्त महत्वाचा वाटतो का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आकांक्षाचा खून झाल्यानंतर तिच्या मृतदेह पोलिसांना घटनेची माहिती न देता हलवणाऱ्या
हॉस्टेलच्या रेक्टर, वार्डन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी सात्तत्याने
केलेली आहे. आकांक्षाला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी अभाविपने बुधवारी(ता.१९)
कँडल मार्च काढला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थींनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.











