छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा ५२, तर शिंदेसेना १४ जागांवर आघाडीवर, तर एमआयएमची २४ जागांवर मुसंडी

Foto
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण मराठवाड्यांचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत असल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण, मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ५२ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमने जोरदार आघाडी घेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर शिवसेना शिंदे गट आता १४ जागा मिळवत दुसर्‍या स्थानावर आला असून, शिवसेना UBT ने  6 जागा मिळवल्या आहेत. 

छत्रपती संभाजीनगर निकाल अपडेट
भाजप  : 52
शिवसेना :  14
शिवसेना UBT :  6
एमआयएम :  24
काँग्रेस : 1
राष्ट्रवादी  : 0
राष्ट्रवादी SP :  1
वंचित बहुजन आघाडी 4
इतर 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ विजयी झाले आहेत.