औरंगाबाद- महानगरपालिकेच्या शहर बस सेवेचा शुभारंभ आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी विकास योजनेतून मनपाला शहर बससेवा सुरू करण्याकरिता निधी दिला आहे. शासनाच्या निधीतून पाच बसेस आल्या आहेत. आणखी २० बसेस लवकरच येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात
२५ बसेस शहरात
धावणार आहेत. त्यानंतर आणखी बसेस येणार आहेत. शहरात शंभर बसेसद्वारे बससेवा
देण्यात येणार आहे. आज सकाळी ९.३० वाजता होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम दुपारी १ वाजता सुरू झाला. यावेळी, खा. चंद्रकांत
खैरे, महापौर नंदकुमार
घोडेले, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, मनपा आयुक्त डॉ निपुन विनायक, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, सभापती राजू
वैद्य, भाजपचे गटनेता प्रमोद राठोड माजी आमदार प्रदीप जैस्वाल, , प्रशांत देसरडा, विरोधी पक्षनेता जमीर कादरी, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, विकास जैन, यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.