औरंगाबाद- रस्त्यांच्या कामाचे भूमिपुजन आणि स्मार्ट सिटी योजनेतील सिटी बस सेवेचा शुभारंभ आदी कार्यक्रम 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. कार्यक्रमाला शहर विकासाकरिता कोटींचा निधी दिलेल्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्या अगोदर महापौर नंदकुमार घोडेले व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची वेळ घेतल्याने सेना व भाजप मध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. यानंतर बुधवारी दि.19 कार्यक्रमा करिता मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याaसाठी गेलेल्या महापौरांसह इतरांना मुख्यमंत्र्यांनीही ताटकळत ठेवले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वेळेवर महापौर घोडेले पोहोचलेच नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस वेळ देऊ शकले नाहीत.
रस्त्यांच्या कामाचे भूमिपुजन आणि स्मार्ट सिटी योजनेतील सिटी बस सेवेचा कार्यक्रमाच्या शुभारंभ विविध विकासकामे यात रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तसेच इतर विकासकामांसाठी सुमारे 100 कोटी रुपये निधी दिलेल्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्या अगोदर महापौर नंदकुमार घोडेले व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची वेळ घेतल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे वेळ घेण्या संबंधी सोमवारी उपमहापौर व महापौर यांच्यात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी झाली होती. शेवटी उपमहापौर विजय औताडे यांची समजूत काढत बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचे ठरले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह इतर पदाधिकारी मुंबईला गेले. सकाळपासून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळवण्यासाठी महापौरांसह भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. मुख्यमंत्र्यांनी महापौर घोडेले आणि शिष्टमंडळाला भेटण्यासाठी सायंकाळी ५ वाजेची वेळ पण दिली होती. मात्र घोडेले यांनी पोहचण्यासाठी तब्ब्ल एक तास उशीर केल्याने. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप आमदारांसोबतच्या नियोजित बैठकीला सुरुवात केली. मुख्यमंत्री बैठकीत व्यस्त असल्याने शेवटी महापौरांची भेट न घेताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येतो असा निरोप पाठविला. त्यामुळे ताटकळत बसलेल्या घोडेले यांना तसेच माघारी परतावे लागले.