नवी दिल्ली- पाच राज्यांतील
विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांना
पुन्हा प्रभू रामाची आठवण झाली आहे. सध्या देशभरात राम मंदिर मुद्याचे प्रचंड राजकारण
सुरू आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीवरुन राजकीय नेतेमंडळी मोठ-मोठी आणि
वादग्रस्त विधाने करताना दिसत
आहेत.
याचदरम्यान, भाजपाचे खासदार
साक्षी महाराज यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी नवी
दिल्लीतील जामा मशिद तोडण्याचे आव्हान केले आहे. इतकेच नाही तर मशिदीच्या पायर्यांमध्ये
देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील, असा दावाही केला आहे. शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) उन्नावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे
वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला होता, तेव्हा म्हणालो
होतो की काशी, मथुरा, अयोध्या सोडा. जामा मस्जिद तोडा. मशिदीच्या पायर्यांमध्ये
देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील. जर मूर्ती आढळल्या नाही तर मला फासावर लटकवा. मी
आजही माझ्या विधानावर ठाम आहे. असे ही ते
म्हणाले.