औरंगाबाद- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी झटणाऱ्या ५० वर्षीय मंजीत कोळेकर यांनी मुलीच्या लग्नाच्या दिवशीच समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केल्याचा प्रकार म्हा़ा कॉलनी भागात सोमवारी उघडकीस आला होता. मृत कोळेकर यांना शहीद घोषित करून त्यांच्या परिवाराला ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, दोन तासाच्या आत घोषित करण्यात यावी अन्यथा औरंगाबाद जिल्हाधिकार्यांसमोर कोळेकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. असे सकल धनगर समाजाच्या वतीने पत्रक जारी करण्यात आले आहेत.
कोळेकर हे मागील अनेक वर्षापासून धनगर समाजाला
आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यरत होते. त्यांनी अनेक वेळा आरक्षणासाठी मंत्री शासकीय
पातळीवर निवेदने आंदोलने केली. ते समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात नेहमी सक्रिय
राहत मात्र यातून त्यांनी सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली. तपासणीदरम्यान
रजिस्टरमध्ये आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सापडला आहे. त्यानंतर समाज
स्तरावर समाज बांधवांनी एकत्र यायला सुरुवात केली आहे. घाटीतील शवविच्छेदन गृहा
बाहेर धनगर समाजाच्या शेकडो बांधवांनी कोळेकर यांना शहिदाचा दर्जा मिळाला पाहिजे. तसेच त्यांच्या
कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर
करण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या
मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहे. या मागण्या दुपारी दोन वाजेपर्यंत प्रशासनाने
मान्य न केल्यास त्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर सरण रचून कोळेकर
यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थिती सर्वस्वी
जबाबदार प्रशासन राहतील असे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.















