प्रियांकाने स्वतःला केले घरात बंद

Foto
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर झालाय. यामुळे या व्हायरसचा सामना संपूर्ण जग करतंय. भारतातही करोनानचा प्रादुर्भाव वाढतोय. 15 राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात करोनाचे 110 रुग्ण आढळले आहेत. सर्वसामांन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजणच या विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना करोना विषाणूपासून वाचण्यासाठी आवश्यकत त्या सर्व गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने करोनाच्या भीतीने स्वतःला अमेरिकेतील घरात बंद करून घेतलं आहे. प्रियांका सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे फोटो शेअर करत घरात राहणं किती सुरक्षित आहे ते सांगितले. फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली की, ’यावेळी आपल्या घरात राहणे सर्वात सुरक्षित आहे. अशावेळी जीनोसोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी फार खास आहे.’ सोशल मीडियावर आता प्रियांकाचे चाहते तिच्या या फोटोंवर कमेन्ट करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने करोना विषाणूशी संबंधीत एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने कोणालाही भेटताना पाश्चिमात्य पद्धतीने त्यांना हात मिळवण्याऐवजी भारतीय पद्धतीने नमस्ते करा. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता. या व्हिडिओला मेसेज लिहिताना तिने लिहिले की, ’सर्व गोष्ट नमस्काराची आहे. जगभरात होत असलेल्या बदलांमुळे लोकांना भेटताना जुनी पद्धत नव्याने वापरण्याची गरज आहे. कृपा करून सर्व सुरक्षित रहा.’ प्रियांका सुरुवातीपासूनच कोणत्याही कार्यक्रमात सर्वांना नमस्कार करूनच भेटते. प्रियांकाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आधीपासूनच आवडत आहे.