चारचाकी कार मधून ऑइल गळत असल्याची थाप मारत भामट्याच्या एका टोळीने कार मध्ये बॅगेत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना औरंगाबाद-जालना रस्त्यावरील मोंढा नाका सिग्नल जवळ आज सकाळी घडली. एका व्यापाऱ्यां सोबत चार दिवसांपूर्वी अशीच घटना मोंढा भागात घडली होती. दोन्ही घटनेतील आरोपी एकच असावेत असा दाट संशय पोलिसांना आहे.मात्र दिवसा ढवळ्या अशा घटना शहरात घडत असल्याने व्यापारी व उद्योजकामध्ये भीती चे वातावरण पसरले आहे..
डॉ.मनोहर रतनलाल अग्रवाल वय ५६ ( एन १, सिडको) असे व्यापाऱ्यांचे नाव आहे. १३ फेब्रुवारी रात्री मदिना चौकात एका व्यापाऱ्याच्या कार वर ऑइल टाकून सव्वादोन लाख रुपयांचे रोकड लंपास करण्यात आले होते. अशीच घटना अग्रवाल यांच्या सोबत घडली. आज सकाळी अग्रवाल हे त्यांच्या (एम एच २० ई जी ८१०९) या क्रमांकाच्या चारचाकीने मोंढा नका सिग्नल परिसरात असलेल्या नेहा फर्निचर या दुकानात जात असताना सिग्नल वर एक अनोळखी व्यक्तीने त्यांच्या कार च्या इंजिनवर ऑइल टाकले व तुमच्या गाडीमधूनऑइल गळती होत असल्याची थाप मारली. चालक व अग्रवाल असे दोघेही कार मधून बाहेर पडताच अज्ञात चोरत्यानी कार मध्ये ठेवलेली बॅग लंपास केली.त्या बॅग मध्ये पाच लाख रुपये रोख, व महत्वाची कागदपत्रे होती. या घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेच्या सहह्याक निरीक्षक डॉ. नागनाथ कोडे, सहह्याक निरीक्षक गोवर्धन कोळेकर,यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदनी चौकात व्यापाऱ्याचे रोकड लंपास करणाऱ्यां टोळीनेच अग्रवाल यांची रोकड लंपास केली असावी असा दाट संशय पोलिसांना आहे..