औरंगाबाद- गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पद रिक्त होते. मंगळवारी (ता.४) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी माजी आमदार कैलास पाटील तर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी अभय पाटील चिकटगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
कैलास
पाटील यांची राजकीय कारकीर्द
माजी आमदार
कैलास पाटील हे गंगापूर तालुक्यातून १९८९ शिवसेनेकडून निवडून आलेले होते. १९९९ ला
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९. २००४, २००९, २०१४ अशा चारही
वेळेस त्यांना विधानसभेचे तिकिट मिळू शकले नव्हते. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात
जातील अशी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीने त्यांची जिल्हाध्यक्ष पदी त्यांची निवड
करुन पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अभय
पाटील चिकटगावकर यांची राजकीय कारकीर्द
अभय
पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष
पद भूषविलेले आहे. त्याचबरोबर वैजापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान
असलेल्या श्री संत शंकर स्वामी मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष आहे.










