औरंगाबाद गंगापूर : औरंगाबाद-नगर रस्त्यावरील कायगाव टोक्यानजीक असलेल्या जुन्या पेपर मिलजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार धडकली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली.
नगर रस्त्यावरील कायगाव टोका जुन्या पेपर मिलसमोर रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. या कंटेनरवर आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादकडे येणार्या कार क्रमांक एम एच 02 बी झेड 9203 ही धडकली. या अपघातात कारचालक शोभित रामशरण बनसल (वय 33), शृती शोभित बनसल (वय 32), शशी रामशरन बनसल (वय 65), वेदांतश शोभित बनसल (वय 1 वर्ष), अश्विनी शोभित बनसल (वय 6 वर्ष), सर्व जण राहणार पुणे हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मगरे, अब्दुल रज्जाक यांनी तातडीने 108 अम्बुलन्सला फोन केला. अम्बुलन्समधील डॉक्टरांनी तात्काळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारास पाठविले. या प्रकरणी अपघाताची गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.