फुलंब्री: येथील बाजार पट्टी रोडवरील जमाल शहा बाबा दर्गाहच्या चौफुली परिसरात इंडियन नं. १ बँकेचे एटीएम आहे. आज दि.२२ रोजी पहाटे चार वाजता चार-पाच जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.पोलिसांनी त्यातील एकाला पकडले असून बाकीचे फरार झाले आहे.
फुलंब्री शहरातील औरंगाबाद - जळगाव रोडवरील फुलंब्री च्या बाजार पट्टी रोडवरील जमाल शहा बाबा दर्गाहच्या चौफुली परिसरात इंडियन नं. १ बँकेचे एटीएम आहे. शनिवारी पहाटे ४ वाजता चोरट्यांनी बँकेचे एटीएम गॅसकटरने फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना त्यांना चोरटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसले. पोलिस कर्मचारी शेख इलियास , चव्हाण यांनी त्यातील एका चोरट्याला पकडले, तर बाकीचे फरार झाले. यात एटीएम मशीन चे नुकसान झाले, परंतु सुदैवाने कोणतेही पैसे चोरीस गेले नाही. चोरटे परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.










