हिंदू धार्मिक समूहाच्या भेटीदरम्यान महिला कर्मचार्‍यांना बाजूला केल्याने आयफेल टॉवर बंद; पॅरिसमध्ये मोठा वाद

Foto
नवी दिल्ली : बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बापस) या हिंदू धार्मिक समूहाने आयफेल टॉवर येथे भेट दिली असताना येथील कार्यरत महिला कर्मचार्‍यांना दृष्टीआड होण्यास सांगण्यात आल्याचा दावा करत येथील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे सोमवारी आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. युरोन्यूजच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पॅरिसमधील या ऐतिहासिक वास्तूचे संचालन करणार्‍या ङ्गफ या संस्थेने सांगितलं की, असाधारण परिस्थितीमुळे आयफेल टॉवर बंद करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये एका नवीन मंदिराचे उद्घाटन करणार्‍या  हिंदू चळवळीशी संबंधित सुमारे १०० लोकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी आयफेल टॉवर येथे भेट दिली होती. युनियनच्या प्रतिनिधी डायन डेव्हॉइन यांनी फ्रेंच टीव्हीला सांगितलं की, शनिवारी या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणांवरून दूर करण्यात आले होते.

कर्मचार्‍यांनी म्हटलं?
आयफेल टॉवरच्या कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध केला. ङ्गङ्घअशा व्यावसायिक सूचना ज्यांमुळे महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या लिंगाच्या (स्त्री असण्याच्या) कारणास्तव बाजूला सारण्यात आले, त्यांच्या जागी इतरांना ठेवण्यात आले आणि त्यांना अदृश्य केले गेले, असं म्हटले आहे.

प्रशासनाने मान्य केलं की हिंदू शिष्टमंडळाने ङ्गङ्घमहिलांशी संपर्क मर्यादित राहीलफफ अशा पद्धतीने भेटीचे नियोजन करण्याची विनंती केली होती, परंतु संस्थेने स्पष्ट केले की अशा अटी स्वीकारल्या जायला नको होत्या. सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या एका निवेदनात पॅरिसमधील  हिंदू मंदिराने म्हटलं आहे की, ते या चिंतेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहेत आणि यामुळे झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल किंवा गैरसोयीबद्दल त्यांनी माफी मागितली. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ङ्गङ्घआमच्या शिष्टमंडळाचा आकार मोठा असल्याने, इतरांना अडथळा किंवा गैरसोय होऊ नये म्हणून आयफेल टॉवरच्या टीमसोबत सामान्य वेळेतच या भेटीची व्यवस्था करण्यात आली होती.

आमच्या माहितीनुसार, कोणत्याही टप्प्यावर कोणालाही आयफेल टॉवरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले नाही,फफ असे सांगत त्यांनी जोडले की, त्यांचा ङ्गङ्घपरस्पर आदर आणि सेवेच्या सार्वत्रिक मूल्यांवरफफ विश्वास आहे. पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोइरे यांनी ङ्गफ वर लिहिले की, ते ङ्गङ्घआयफेल टॉवरच्या कर्मचार्‍यांमधील असंतोषाची जाणीव ठेवून आहेत आणि अशा अटी मान्य करणे अस्वीकार्य आहे. ही माझी मूल्ये नाहीत, किंवा आयफेल टॉवरने जपली पाहिजेत अशी मूल्येही नाहीत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला मुक्तपणे वावरता आले पाहिजे,फफ असे सांगत त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले जातील असे स्पष्ट केले.

नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षा येल ब्रॉन-पिव्हेट यांनीही या घटनेचा निषेध केला. ङ्गङ्घपरदेशी पाहुण्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिलांना बाजूला होण्यास सांगितले जावे, हे मला अजिबात मान्य नाही. इतरांचे स्वागत करणे म्हणजे कधीही आपल्या मूल्यांचा त्याग करणे नव्हे. फ्रान्समध्ये महिला सार्वजनिक जीवनात पूर्णपणे उपस्थित असतात. तिथे कोणीही त्यांना अदृश्य होण्यास सांगू शकत नाहीफफ असं ते म्हणाले.
बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था () ने फ्रान्समधील आपल्या पहिल्या मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केल्याच्या दुसर्‍याच दिवशी ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पॅरिसमधील स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनानिमित्त भाषण करताना भारत-फ्रान्स संबंधांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी विशेष आहे कारण ती दीर्घकालीन सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांच्या पायावर उभारली गेली आहे.

पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली होती की हे भव्य मंदिर भारत आणि फ्रान्समधील सहकार्य आणि संधींचे प्रतीक म्हणून शतकानुशतके उभे राहील. ङ्गङ्घअलिकडच्या वर्षांत भारत आणि फ्रान्समधील संबंध एका नवीन उंचीवर पोहोचले आहेत. माझे मित्र अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दोन्ही देश एक विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करत आहेत,फफ असे ते म्हणाले होते.