मी तर ''चौकीदार ही चोर है'' हा चित्रपट मोदींच्या आयुष्यावर बनवेल

Foto

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ठाकरे’ आणि  माजी पंतप्रधान काँग्रेसचे ‘मनमोहन सिंग’ यांच्या जीवनावर आधारित ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटानंतर आता मोदींच्या जीवनावरही चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा चालू आहे. त्यातच आता गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज ताक शी बोलताना मोदींची खिल्ली उडवली. ते म्हणाले, मला जर मोदींच्या जीवनावर चित्रपट बनवायला मिळाला तर मी ‘चौकीदार ही चोर है’ किंवा ‘झुठा प्रधानमंत्री’, ‘डिझार्स्टर्स ऑफ प्राइम मिनिस्टर ‘ या नावाने चित्रपट बनवेल.

 

 

नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले दुर्दैवी पंतप्रधान आहेत. या चित्रपटातून भाजपाच्या ग्लोबलायजेशन विकास मॉडेलचं वास्तव मला मांडायचं असल्याचं मेवानी यांनी म्हटले. तसेच सुपरस्टार शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्याही कमाईचे रेकॉर्ड हा चित्रपट मोडीत काढेल, असंही मेवानी यांनी म्हटलं.