LIVE : संविधान बचाओ देश बचाओ जाहिरसभा, कन्हैय्याकुमार यांचे मंचावर आगमन

Foto

औरंगाबाद- सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या 'संविधान बचाओ देश बचाओजाहिरसभेत  प्रमुख मार्गदर्शक कन्हैय्याकुमार यांचे मंचावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल.  सभेचे प्रास्ताविक संयोजक आमदार सतीश चव्हाण करत आहेत. मंचावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटी, एआय एस एफ, बामुक्टा, मुप्टा, एस एफ आयएन एनएसयूआय, बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चागब्बर अक्शन कमिटी, शेतकरी कामगार विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित आहे.

आ. चव्हाण यांच्या भाषणातील मुद्दे

 

आज प्रत्येक जण भयग्रस्त आहे.  हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही.   बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्यानुसार आज राज्यकारभार होत असल्याचे दिसत नाही.  संविधान विरोधी शक्ती थोपवण्यासाठी ही सभा आहे.