कचरा उचलल्यामुळे आध्यात्मिक सुख मिळते, तर मोदी गटर गटर का करत नाही- कन्हैय्याकुमार

Foto

औरंगाबाद- 'संविधान बचाओ देश बचाओ'  जाहिरसभेत  कन्हैय्याकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर चौफेर टीका केली. संविधानाचे संरक्षण, मनुवाद, राम मंदीर, देशातील प्रश्न अशा सर्व मुद्द्यांना त्यांनी हात घातला. मोदी हे कसे मनुवादी आहे हे सांगताना कन्हैय्याकुमार म्हणाले, मोदी म्हणतात कचरा उचलल्यामुळे आध्यात्मिक सुख मिळते. मग निवडणुकीत मोदी मंदिर मंदिर का करतात गटर गटर का करत नाही. गटर मध्ये उतरून कचरा का साफ करत नाही. हा सवाल कन्हैय्याकुमार यांनी केला.

काय म्हणाले कन्हैय्याकुमार

 

औरंगाबाद मध्ये दिल्ली गेट आणि रंगीन गेट मी पाहिले. मी दिल्लीहून आलो.  तिथेही एक दिल्ली गेट आणि एक रंगिन प्रधानमंत्री आहेत.


मंदिराचा मुद्दा
 १९९२ पासूनचा आहे. या मुद्द्यावर भाजप दोनवेळा  सत्तेवर  आली आहे. आता पुन्हा एकदा मंदिर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हे आता आपण समजून घेतले पाहिजेत.


२०१४ च्या निवडणुकीत जी आश्वासने मोदींनी दिली होती त्याचा एकदाही मन की बात मध्ये उल्लेख केला नाही.
  ते मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला येत नाही. तर ते प्रियंका चोप्रा आणि अनुष्काच्या रिसेप्शनला जातात.

 

लोक कल्याणकारी योजना बंद करून तो पैसा मोदी त्यांच्या मित्रांना देणार आहे.

 

मंदिर बांधण्यासाठी मशिद तोडली नव्हती. तर सरकार बनवण्यासाठी मशिद तोडण्यात आली होती.

 

हे रामाचे भक्त नाही नथुरामचे भक्त आहेत.


२०१४ मधील मोदींचा विकास साडेचार वर्षात कुठेच दिसला नाही. आ ता तो विकास झोला घेऊन मंदिराकडे निघाला आहे.

 

ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है , देश का नौजवान, किसान और संविधान खतरे में है.


आमच्यावर जातीयवादी आणि कार्पोरेटवाद थोपवला जात आहे.


संघ आणि भाजपला हरवण्यासाठी आता आम्हाला मतदान करावे लागणार आहे.

 

यावेळी कन्हैय्याकुमार यांनी ‘तुमचे आमचे नाते काय जय शिवाजी जय भीमराव’ असा नवीन नारा दिला.