देशात आरबीआय आणि सीबीआय ची पडझड- मेधा पाटकर

Foto

औरंगाबाद- देशात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आरबीआय आणी सीबीआय सारख्या संस्था धोक्यात आली आहे. पाच राज्यातील सत्ताबदल शेतकऱ्यांची अस्वस्थता दाखवून देते. असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.

 

प्रा एस.एम.देसरडा यांच्या अमृत महोत्सव व अभिष्टचिंतन निमीत्त  एमजीएम च्या रुख्मिणी सभागृहात आयोजित भारतीय शेती पर्यावरण व परिवर्तनाच्या चळवळी समोरील आव्हाने एक विचार मंथन या विषयावर राष्ट्रीय किसान दिन परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी हावर्ड विद्यापीठाचे माजी प्राध्यापक मार्क लिनले,आ सुभाष जांबड, बाबुराव कदम, प्रा एस एम देसरडा उपस्थिती होते.

 

यावेळी बोलताना मेधा पाटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन खूपच चांगले करण्यात आले. प्रा देसरडा यांनी जन चळवळीशी स्वतःला जोडून ठेवले ज्यांचे हात मातीचे आहेत त्याना न्याय देण्यासाठी कायम ते झटत असतात. शेती पासून ते आर्थिक स्थिती बाबत त्यांचे स्पष्ट विचार खरंच कालसंगत असतात. त्यामुळे राज्याला त्यांचे योगदान मोठे आहे. देसर्डांच्या विचारांची देशाला गरज आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर व्हावे लागले हे चळवळीचे यश आहे. त्याचे श्रेय देसरडासारख्या कार्यकर्त्यांचे आहे.

 

तर प्रा देसरडा यांनी पर्यावरणीय संस्कृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. आपण नेत्यांचे दैवतीकरण करतो. गांधीजी, आंबेडकर यांना देव बनवून टाकले. राजकारण्यांनी त्याचा फायदा घेतला. जात धर्म यावर राजकारण करतात. एकमेकांच्या भांडणात राजकारण पुढे जातंय. परवा अरुंधती रॉय आल्या होत्या. त्या म्हणाल्या विद्यापीठात मूर्ख लोक तयार होत आहेत. म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था किती रसातळाला गेली आहे. फार बरे झाले तुकोबा, शेक्सपियर मार्क्स, विद्यापीठात गेले नाहीत असे ते म्हणाले.

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker