औरंगाबाद- सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या 'संविधान बचाओ देश बचाओ' जाहिरसभेत प्रमुख मार्गदर्शक कन्हैय्याकुमार यांचे मंचावर आगमन झाले आहे. सभेला सुरुवात झाली असून, आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.
आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या भाषणातील मुद्दे
भारतीय संविधान जाळण्यापर्यंत मजल गेली आहे. हिंदू मुस्लीम यांच्यात भांडणे कसे होतील याकडे जातीयवादी शक्तींचे लक्ष आहे.
औरंगाबाद कचरा प्रश्नामुळे चर्चेत आले होते. पण हा कचरा फक्त औरंगाबाद मध्येच नाही तर संपूर्ण देशात झाला आहे. हा कचरा आम्हाला साफ करायचा आहे.










