लोकसभेसाठी एक संधी द्या, चमत्कार करून दाखवेन हर्षवर्धन जाधवांची पेपरातून जाहिरात

Foto

औरंगाबाद- मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून स्वतःचा राजीनामा देणारेकोणताच पक्ष मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीअसा हल्लाबोल करून स्वतःचा राजकीय पक्ष काढणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपण खैरेंच्या विरोधात लोकसभा लढवणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. पेपरातून स्वतःचा राजीनामा स्वीकारावा म्हणून जाहिरात देणारे आमदार जाधव यांनी आता लोकसभेसाठी मला एकदा संधी द्या अशी जाहीरात दिली आहे. 


लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण पेट घेत आहे. यात हर्षवर्धन जाधव मागे राहतील कसे. नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारे जाधव आता अशाच एका जाहिरातीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी चक्क लोकसभेसाठी संधी द्या मी चमत्कार करून दाखवतो अशी जाहिरातच पेपरवर दिली आहे. त्यांनी नुसती जाहिरातच दिली नसून एक लेख सुद्धा जाहिरातीत दिला आहे. त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे किमी पक्षातील राजकारण आणि मराठा समजला न मिळणारा न्याय या गोष्टींना कंटाळून स्वतःचा राजकीय पक्ष काढला आहे. हा पक्ष मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करणार आहे.


खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी म्हटले कि दुसऱ्या पक्षात ७० वर्षाचे लोक १९ वर्षाच्या मुलाच्या पाय पडतात कारण काय तर पक्षप्रमुखांच्या मनात स्थान मिळावं. ते पण भर सभेत. यांनतर त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना लक्ष करत म्हणाले कि स्वतःला शूरवीर समजणारा नेता पक्षाच्या लांगूलचालनापायी स्वतःच्याच जातीच्या युवकांना बेदम चोप देतो. हे सगळे चित्र पाहून आपले मन उद्विग्न झाले असल्याचे त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे. ते पुढे म्हणाले कि स्वतःला औरंगाबाद चे हिंदूधर्मरक्षक म्हणवणाऱ्या लोकांनी २० वर्षात हिंदू देवतांच्या मंदिरांना २० वर्षात जेवढे सभा मंडप देऊ शकले नाहीत तेवढे मी एकट्याने ५ वर्षात दिले आहेत. जाधव पुढे म्हणतात कि लोकसभेचे कामकाज हिंदी किंवा इंग्रजी मध्ये चालते आणि बऱ्याच  खासदारांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचं ज्ञान नाही. त्यामुळे आपल्या  मतदार संघातील प्रश्न मांडताना यांचा गोंधळ उडतो. मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे. माझ्यावर लोकसभा निवडणूक लढवू नये म्हणून दडपण आणले जात आहे. कारण मी सत्य बोलतो आणि सत्य लोकांना पच नाही. जर माझ्या उमेदवारीने काहीच फरक पडत नसेल तर मला गप्प का करता. असं सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे मी औरंगाबादच्या जनता जनार्धनाकडे विनंती करतो कि मला औरंगाबादचे प्रतिनिधित्व करण्याची एक संधी द्या. अशी जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली आहे.