औरंगाबाद- पोलिसात विरोधात तक्रार दिल्यावरुन महिलांना जमावाने मारहाण केल्याची घटना नारेगाव येथे मंगळवारी (ता.२०) सकाळी घडली आहे.
नारेगाव येथे एक
नागरीक अवैध धंदे चालवतो म्हणून त्याच्या विरोधात काही महिलांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे
गाठुन तक्रार दिली. तक्रार मिळाल्यामुळे पोलिस त्या नागरीकाच्या घरी सोमवारी
रात्री गेले. तो माणूस प्रतिष्ठीत असल्यामुळे त्याला अटक करतांना काही महिला
पोलिसांना देखील आडव्या आल्या. पोलिसांनी हा विरोध झुगारुन सदरील व्यक्तीला अटक
केली. ही माहिती नारेगाव येथे वार्यासारखी पसरली.
एमआयडीसी सिडको
पोलिस ठाण्यात रात्री मोठ्या प्रमाणात जमाव जमला. अखेर पोलिसांनी सदरील व्यक्तीला
रात्री सोडून दिले. मंगळवारी (ता.२०) सकाळी त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार देणार्या
महिलांच्या घरी जमाव धडकला. महिलांना रस्त्यावर काढून बेल्टने लाथाबुक्यानी मारहाण
केली. महिलांसोबतच लहान मुलांना देखील माराहाण झाली. पोलिस मात्र नारेगावात फिरकले
सुद्धा नाहीत. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.















