जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या 'खिडकी गॅंग'च्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या, दोन अटकेत एक फरार...

Foto


 

औरंगाबाद-  शहरासह जिल्हाभरात घरफोडी करून  सोने चांदी रोख लंपास करणाऱ्या कुख्यात खिडकी गॅंग च्या  दोन गुन्हेगारांना गुन्हेशाखेने बीड येथुन अटक केली.त्याचा एक साथीदार फरार झाला.दोघांनी जिल्ह्यातील अनेक गुन्हाच्या कबुली दिली..

 

शंकर तानाजी जाधव वय 35(रा.बीड), बलबीर उर्फ बल्ल्या अमृत जाधव (रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या खिडकी गॅंग च्या गुन्हेगारांची नावे आहेत. मागील अनेक वर्षांपासून जिल्हाभरात खिडकी गॅंग ची दहशत होती.ही गॅंग बंद घरांना लक्ष करून खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करीत घरातील दाग दागिने,रोकड मौल्यवान वस्तू लंपास करीत या टोळीतील मुख्य म्होरक्या सध्या एका प्रकरणात कारागृहात आहे.त्या टोळी मधील  शंकर हा एक सदस्य होता मात्र तो बाहेर असल्याने तोच गॅंग चा म्होरक्या बनला होता व कारागृहात असलेल्या त्याच्या आकाच्या बोलण्यावरून गॅंग चालवीत होता अशी माहिती सूत्रां कडून मिळते. सिडको भागात 8 ऑक्टोबर रोजी या गॅंग ने एका घराला लक्ष करीत घरातील 95 हजार रुपयांचे ऐवज लंपास केले होते.या प्रकरणातील आरोपी हे बीड येथे लपल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेला मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहहयक निरीक्षक अजबसिंग जारवाल, यांच्या पथकातील शिवाजी झिने,राजेंद्र साळुंखे,सुनील धत्राट, गजानन मानटे, भरत बहुरे. यांनी बीड गाठत तेथून शंकर व बालबीर यांना सापळा रचून जेरबंद केले. त्यांनी शहर व जिल्हाभरात 3 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.त्यांच्या कडून जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.