वाळूज- पंढरपूरातील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करत जवळपास दोन लाखाचे सोन्याचे दागिणे लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
रमेश जगन्नाथ चव्हाण (रा. भारंबा तांडा
ता. कन्नड ह.मु. पोलीस कॉलनी पंढरपूर) हे पत्नी सीता व मुली पुजा आणि पायल
यांच्यासह पंढरपूर पोलीस कॉलनी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी दोघे
पती-पत्नी कामाला गेले होते. तर मोठी मुलगी पुजा ही महाविद्यालयात आणि लहान मुलगी
पायल शाळेत गेली होती. पुजा सायंकाळी पावणेपाच वाजता कॉलेजमधून घरी आली असता तिला घराचा दरवाजा उघडा
असल्याचे दिसले. घराचे दार उघडे दिसताच
पूजाने ही माहिती कामासाठी बाहेर गेलेले वडिल रमेश चव्हाण यांना फोनवरून दिली.
माहिती मिळताच चव्हाण यांनी पत्नी सीताला सोबत घेवून घर गाठले. घरातील कपाटाची
पहाणी केली असता कपाटातील ड्राव्हर वाकलेले व आतमध्ये ठेवलेले ६ तोळे सोन्याचे
दागिणे गायब असल्याचे दिसून आले. हा
चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी वाळूज एमआयडीसी पोलीसांशी
संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फौजदार डी.बी. कोपनार यांनी
पथकासह घटनास्थळी येवून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत
गुन्हा दाखल नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
दोन लाखाचे दागिणे लंपास
अज्ञात चोरट्यांनी रमेश चव्हाण यांच्या
बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करित कपाटातील सोन्याच्या दागिण्यावर हात साफ
केला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले २ तोळ्याची सोन्याची साखळी, ३ तोळ्याची पोत व ११ गॅमचे नेकलेस असा
एकूण ६ तोळ्याचा जवळपास दोन लाखाचा ऐवज लांबविला आहे. चोरट्यांनी घरातील इतर
साहित्याला हातही न लावता केवळ कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिण्यावरच हात
मारल्यामुळे कोणीतरी पाळत ठेवून चोरी केली असल्याचा अंदाज रमेश चव्हाण यांनी
व्यक्त केला आहे













