औरंगाबाद- किरडपुरा भागातील किराणा दुकानदार समद खान यांची भरदिवसा ६ जणांनी दाभन आणि कात्रीने हल्ला करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. जिंसी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवीत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हत्येनंतर घाटी रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण आहे.