‘सांजवार्ता’ शी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चीन, जपान कोरिया, इटली, इराण, अमेरिका, फ्रान्स तैवान, जर्मनी, मलेशीया आणि अरब अमीरात या अकरा देशाशी व्यावसायीक किंवा पर्यटनाच्या दृष्टीने संबंध आलेल्या औरंगाबादकरांची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील एक महिला प्राध्यापक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर तर तपासणी मोहीम अधिक वेगवान करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, वर नमूद केलेल्या 11 देशात येण्या जाण्याचा इतिहास असलेल्या प्रत्येक औरंगाबादकराची तपासणी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरच या लोकांची तपासणी होत असते. औरंगाबादचे विमानतळ काही आंतरराष्ट्रीय नाही हे जरी खरे असले तरी एकाप्रकारची दक्षता घेण्याच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात येत आहे. अशा नागरिकांची यादी तयार असते, त्यामुळे त्यांना शोधण्याचा वगैरे प्रकार करावा लागत नाही. तसेच ही मंडळी स्वतःच अलर्ट असणे त्यामुळे हे काम अधिक सोपे होऊन जाते. या तपासणीत ताप, कफ, सर्दी-पडसे यापैकी एखादे लक्षण जरी आढळून आले तर संबंधित व्यक्तीची लाळ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे अधिक तपासणीसाठी पाठवून देण्यात येते, असे ते म्हणाले.
चिकलठाणा येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दोन संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल आहे. दोघा रुग्णांचा स्व्याब चाचणी साठी पुणेच्या राष्ट्रीय लॅब येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान दोघां पैकी एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे..ूरर रिपोर्ट बाबत माहिती देण्यासाठी जेव्हा डॉक्टर सुन्दर कुलकर्णी गेले तेव्हा सदर रुग्ण अक्षरश हादरलेला होता. आपला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजलं तेव्हा तो चक्क डॉक्टर कुलकर्णींच्या पायावर पडला. रडतांना त्या सुदैवी रुग्णाने डॉक्टर कुलकर्णीचे उपकार मानले. विशेष म्हणजे हे दोघे रुग्ण नुकतेच दुबई हुन फिरायला गेले होते तेथून ते औरंगाबादला परतले होते.
8कोरोना रोगाच्या साथीने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. औरंगाबादेतही कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावर रोगाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच आरोग्य विभागातील अधिकार्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.