औरंगाबाद- करमाडपासून जवळच असलेल्या ढवळापुरी येथील एका तरुणाचा ट्रॅक्टर उलटून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी बाजीराव वाघ (वय ३५, रा.ढवळापुरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी वाघ हा दुसर्याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर घेऊन शेतात काम करण्यासाठी गेला होता.
घराकडे परत येत असताना ट्रॅक्टर अचानक उलटला. पलटी
होताच शिवाजी ट्रॅक्टरखाली दबला गेला. रस्त्यावरील नागरिकांना ही बाब लक्षात येताच
त्यांनी शिवाजीला ट्रॅक्टरखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तेथे
डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.










