पुणे- मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार लक्ष्मण माने वादग्रस्त विधाने करण्यास सुरुवात केली आहे. पुणे येथे आयोजित ओबीसी आरक्षण जागरण परिषदेला लक्ष्मण माने उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पाटलांनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं
पाठवा, तिला मी लावणी शिकवतो.आम्हीच काय
नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा
सवाल करून माने म्हणाले,"
आता आमची लोक बॅंड वाजवणार नाहीत, पाटलांचे बॅंड असले पाहिजेत. आता
तुम्ही फेटे उडवू नका. तुम्ही बॅंड वाजवा.
सत्तर वर्षे पाटलांनी खूप खाल्ले आहे.
आता आम्ही सत्ता मिळवणार आहोत. आता आमची कोणाला
काही मागण्याची वेळ नाही. मागणाऱ्याच्या रांगेत आम्ही थांबणार नाही. आम्हीच आमची
सत्ता निर्माण करू. असा विश्वास माने यांनी व्यक्त केला
















