मुंबई- लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचे तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. विमान दुर्घटना पथकाने मंगळवारी (ता.२७) आपला अंतिम अहवाल सादर केला.
२५ मे २०१७ रोजी
निलंग्याहून मुंबईच्या दिशेने निघताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
या अपघातातून फडणवीस थोडक्यात बचावले होते. अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा
प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात म्हटले आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये किती वजन असावे, तापमान किती असाव याचा विचार करण्यात आला नव्हता. प्रवासी, सामान, इंधनासह
हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. न मोजलेल्या ७२ किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचे एकूण वजन सुमारे ५०७२ किलोंवर पोहोचले होते, असे अहवालात
म्हटले आहे.
















