कॅनॉट येथील कॅफेत तरुण-तरुणींचे सुरु होते अश्लील चाळे, पोलिसांच्या धाडीत सापडले ८ अल्पवयीन

Foto

औरंगाबाद-  तरुण-तरुणींचे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाणार्‍या कॅनॉट येथील मोकोहोलिक या कॅफेत पोलिसांनी छापा मारून अश्लील चाळे करणार्‍या २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात आठ अल्पवयीन मुले-मुली आढळूनली. शहरात विविध मोठ्या ब्रँडचे कॅफे आहेत. याठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकांतात वेळ घालविण्यासाठी येत असतात. सायंकाळनंतर या कॅफेंचे रंग बदलतात आणि कॅफेमध्ये मंद प्रकाशात अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.  

 

...यामुळे वाढतोय कॅफेमध्ये तरुण तरुणींचा ओढा

 

बर्‍याच दिवसापासून कॅनॉट येथील मोकोहोलिक या कॅफेमध्ये मंद प्रकाशात तरुण-तरुणी एकांताच्या नावाखाली अश्लील चाळे करीत होते. याचे व्हीडीओ देखील व्हायरल झाले आहेत. यापैकीच काही व्हीडीओ सिडको पोलिसांच्या हाती लागले होते. सोमवारी अखेर पोलिसांनी कॅफेत जाऊन पडताळणी केली असता व्हीडीओतील वास्तव त्यांच्या समोर आले. पोलिसांनी छापा टाकत अश्लील चाळे करणार्‍या २० जणांना पकडले. अशाप्रकारे शहरात मोठ्या प्रमाणात कॉफी कॅफे, आईस्क्रीम कॅफे, ज्यूस कॅफे, टी. कॅफे आहेत. या कॅफेत महाविद्यालयीन तरुण-तरुणी निवांत वेळ घालविण्यासाठी येत असतात. काही कॅफेंमध्ये फक्त दोन चेअर असलेल्या टेबलची व्यवस्था केलेली असते आणि इथे कितीही वेळ बसले तरी कॅफे चालक त्यांना काहीही बोलत नाही. निवांत एकांतात वेळ घालविण्यासाठी कॅफे हे सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने, अशा कॅफेंकडे तरुणांचा ओढा वाढत आहे.

 

कॅफेत जाणार्‍यांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कॅफे चालकांनीदेखील अशा तरुण-तरुणींसाठी खास व्यवस्था केली आहे. कॅफेच्या आतमध्ये मंद प्रकाश ठेवला जातो. तरुण तरूणींना बसण्यासाठी  स्वतंत्र व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि कोणाकडून त्रासही होणार नाही. अशी काळजी कॅफेचालकांकडून घेतली जाते. त्यामुळे कॅफेत अश्लील चाळे चालू असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

 

ठराविक कॅफेकडे कल 

 

अश्लील चाळे करण्यासाठी काही कॅफेकडे तरुण-तरुणींचा कल आहे. येथे त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केलेली असते. अशा कॅफेत तरुण-तरुणींना ज्यादा पैसे मोजावे लागतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

पालकांनो तूमची मुले कुठे जातात जरा लक्ष ठेवा!

 

कॅनॉट येथील कॅफेवर धाड पडल्यानंतर उच्चभ्रू वस्तीतील पालकांनी सिडको पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. त्यासोबतच काही मध्यमवर्गीय पालकही आपल्या मुलांना सोडविण्यासाठी येथे आलेले होते. पकडले गेलेल्यांमध्ये बहुतेक अल्पवयीन मुले असल्यामुळे पालकांची मनस्थिती अतिशय वाईट झालेली होती. यामुळे आपली मुले काय करतात, कुठे जातात, दिवसभरातील शाळा, कॉलेज आणि क्लासेस झाल्यानंतर सायंकाळी लवकर घरी का येत नाही याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.