औरंगाबाद दि.17 (सांजवार्ता ब्युरो) महापुरुषांच्या नावाचा उल्लेख करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो 'टिक-टॉक' या सोशलमीडिया वर अपलोड करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.रुपेश रमेश गजहंस वय-24 (रा.ग.क्र.18, मुकुंदवाडी, संजयनगर) असे आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सायबर पोलीसांचे पथक सोशलमीडिया वरील प्रत्येक आक्षेपार्ह गोष्टीवर बारीक नजर ठेवून आहेत.याच दरम्यान सायबर पोलिसांना एक आक्षेपार्ह व्हिडिओ 'टिक-टॉक' या सोशलमीडियावर व्हायरल होत असताना आढळला होता.ती माहिती सायबर विभागाने गुन्हे शाखेला दिली होती.या बाबत गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक योगेश धोंडे यांना माहिती मिळाली की, हा व्हिडिओ रुपेश गजहंस या तरुणाने बनवून टाकला आहे.या व्हिडिओ मध्ये महापुरुषांच्या नावाचा वापर करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काही आक्षेपर्य वाक्य होते.पोलिसांनी तरुणाला मोंढा नका भागातून अटक केली.त्याच्याविरोधात कलम294,153(अ) सह आय.टी.ऍक्ट नुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याने अजून काही व्हिडिओ बनवून प्रसारित केले आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.