पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या अधिवेशनात भारीप चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला. भाजप सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे हे सरकार जातीपातीत भांडण लावल्याशिवाय आणि दंगली घडविल्याशिवाय पुन्हा सत्तेत येऊच शकत नाही अशी सडकून टीका प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केली.
पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे तिसरे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, हे सरकार मनुवादी विचारसरणीला खतपाणी घालणारे आहे. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांचे मारेकरी अजूनही सापडत नाहीत की सरकारला शोधायचे नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वंचित, बहुजन आणि मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर वचिंत बहुजन आघाडीचा उमेदवार
निवडून द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
















