मुंबई- राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘प्रकाश आंबेडकर हे नक्षलवाद्यांशी हितसंबंध असल्याचे वक्तव्य केले होते. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून’ दिलीप कांबळे हे बिनडोक असल्याची टीका’, भारिपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलत असताना केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण, राफेल डील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत भाष्य केले.
प्रकाश आंबेडकर हे समाजात चुकीची माहिती पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत. या आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे आता जग जाहीर झाले आहे. म्हणून या आंबेडकरांवर कोणी विश्वास ठेवू नये असा घणाघाती आरोप दिलीप कांबळे यांनी केला होता .कांबळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकरांनी ‘राज्यमंत्री दिलीप कांबळे हे बिनडोक असल्याचे