शिऊर बंगला, गंगापूर चौफुलीमध्ये बांधकाम मंत्र्यांच्याहस्ते रस्त्यांचे भूमिपूजन

Foto


औरंगाबाद- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे शिऊर बंगला- औराळा-चापानेर-कन्नड-हस्ता, शिऊर-येवला आणि गंगापूर चौफुली येथे वैजापूर-गंगापूर-भेंडाळा फाटा रस्त्यांचे भूमिपूजन आज महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले.

 

हायब्रीड अँन्यूईटी योजनेअंतर्गत असलेल्या रसते कामांचे कुदळ मारून, श्रीफळ वाढवून आणि कोनशिलेचे अनावरण करून पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच वैजापूर नगर परिषदेसही त्यांनी सदिच्छा भेट दिली.

 

या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, एकनाथ जाधव यांची उपस्थिती होती.

 

शिऊर बंगला-हस्ता रस्ता १६१ कोटी तर वैजापूर-भेंडाळा फाटा रस्ता १९० कोटीचे आहेत. शिऊर बंगला ते हस्ता रस्ता ४७ किलोमीटर आहे. तर वैजापूर-भेंडाळा रस्ता ४६ किलो मीटरचा आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत मांगूळकर यांनी दिली. शाखा अभियंता पी.व्ही. कुलकर्णी, एम.एम. आझमी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, एस.आर त्रिभुवन, उपविभागीय अभियंता एम.टी. क्षीरसागर आदी कार्यक्रमास उपस्थित होते.