मोदींची मुलाखत मॅनेज होती, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून बोचरी टीका

Foto

मुंबई- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्‍न विचारल्यासारखे होते. मोदींची ही मुलाखत पूर्णपणे मॅनेज होती, असा आरोप राज यांनी केला आहे. तसे स्पष्टपणे सुचवणारे एक व्यंगचित्रच त्यांनी रेखाटले आहे. 

 

राफेल करार, नोटाबंदी, राम मंदिर, तीन राज्यांतील पराभव अशा अनेक घडामोडींच्या पाश्‍वर्र्भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीची देशभरात चर्चा झाली. काँग्रेससह विरोधकांनी या मुलाखतीवर टीका केली. मात्र, राज ठाकरे यांनी त्याही पुढे जाऊन ही मुलाखतच मॅनेज असल्याचा आरोप केला आहे. मोदींच्या मुलाखतीवर कोरडे ओढणारे एक व्यंगचित्र राज यांनी रेखाटले असून, एक मनमोकळी मुलाखत असे शीर्षक या चित्राला दिले आहे. त्यात मुलाखतकाराच्या खुर्चीतही मोदीच बसल्याचे  दाखवले आहे. मुलाखत घेणारे मोदी, मुलाखत देणार्‍या मोदींना मकाय विचारू अशी विचारणा करताहेत. याशिवाय, ढोल वाजवणारे मोदी, परदेश दौर्‍यावर निघालेल मोदी, पटेलांच्या पुतळ्याला निरखणारे मोदी, लोकांना अभिवादन करणारे मोदी अशी मोदींची अनेक रूपं या चित्रात राज यांनी दाखवली असून, हे व्यंगचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 

 

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले. 2019 ची चिंता त्यांच्या चेहर्‍यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार. राम मंदिराच्या मागणीसाठी शेकडो कारसेवक मारले गेले, हिंदूंचा नरसंहार झाला. दंगली झाल्या. न्यायालयांच्या प्रक्रियेतून राममंदिराचा निर्णय घ्यायचा होता मग हा रक्‍तपात आणि नरसंहार घडवला कशासाठी? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker