पुणे – धायरी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणाचा सिंहगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. घरात मृतावस्थेत सापडलेल्या मुलीचा मारेकरी तिच्या मावशीचाच नवरा निघाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोक्सा कायद्याखाली त्याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
धायरी येथील
निळकंठ हाईटसमधील प्लॉट क्रमांक १५ येथे राहाणाऱ्या १७ वर्षीय मुलगी गुरुवारी (ता.
६) राहात्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा
गळा दाबून खून करण्यात आल्याचे लक्षात आले. त्याआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार
झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले होते. या प्रकरणाचा सिंहगड पोलिसांनी
अवघ्या १२ तासात तपास करुन आरोपीला जेरबंद केले आहे.
काय घडले होते
गुरुवारी
निळकंठ
हाइट्समधील तिसऱ्या मजल्यावर राहात असलेली १७ वर्षीय युवती गुरुवारी (ता. ६)
सायंकाळी घरात बेशुद्ध पडलेली होती. तिचा १५ वर्षीय भाऊ नरेश (नाव बदलण्यात आले
आहे) घरात आल्यानंतर त्याने बहिणीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज देऊनही ती
उठली नाही. ताई उठत नाही म्हणून नरेश शेजाऱ्यांकडे धावत गेला. शेजाऱ्यांनी
बेशुद्धावस्थेतील युवतीला तातडीने सिल्व्हर
बर्च हॉस्पीटल, धायरी, पुणे येथे नेले. तिथे सायंकाळी ७.१५ वाजता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
उपचारांपूर्वीच युवतीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. युवतीच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांनी संशय व्यक्त
केला होता. त्यामुळे तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यात युवतीवर लैंगिक अत्याचार
झाल्याचे निष्पन्न झाले. अत्याचारानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचेही पोस्टमॉर्टम
रिपोर्टमध्ये म्हटले.
बलात्काराचा
गुन्हा दाखल
पोस्टमॉर्टम
रिपोर्टनंतर सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम, ३०२, ३७६, ३७७
आणि पोक्सा अॅक्टनुसार गुन्हा दाखल
करण्यात आला. या गुन्हयाचा तपास करीत असतांना अल्पवयीन मयत मुलीच्या मैत्रिणींकडे, बिल्डींगमध्ये रहाणारे लोकांकडे, नातेवाईकांकडे
सखोल चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान मयत मुलीच्या मावशीचा नवरा नितीन बाबासाहेब
दामोदर, वय-३० वर्षे (रा. साक्षी रेसीडन्सी, तिसरा मजला, भैरवनाथ मंदिरजवळ, नरे, पुणे) याच्याकडे
सखोल चौकशी केली. नितीन दामोदर हा बिल्डिंगच्या आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये
दिसून आल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये
नितीन हा मयत मुलगी रहात असलेल्या बिल्डींगमध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसले. तसेच
त्याच्या संपूर्ण शरीराची पहाणी करता, त्याच्या गळयाजवळ
खरचटल्याचे व्रण दिसुन आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केल्यानंतर
त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या बलात्कार आणि खून प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संगीता यादव करीत आहेत.
















