औरंगाबाद- शहरातील अतिसंवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या राजाबाजार येथील शहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरातील दान पेटी रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यानी अवघ्या तीस सेकंदात पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.विशेष म्हणजे मंदिराच्या दहाफुट जवळच पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले होते.तरी देखील ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहराचे आराध्य दैवत अशी ओळख असलेल्या गजबजलेल्या राजाबाजार भागातिल संस्थान गणपती मंदिर मधील दान पेटी आज पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटाला रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यानी पळविली, ही घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी ओमकार दीक्षित हे मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी आले असता तेंव्हा समोर आली.मंदिराच्या दर्शनी भागात असलेली स्टील ची दान पेटी ही लोखंडी रोड पासून वेगळी करीत ती पाठविण्यात आली. ही सर्व घटना मंदिराच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी पथकासह मंदिर परिसराची पाहणी केली.दरम्यान मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मध्ये ( एम एच २० ४२४५) असे रिक्षाचे क्रमांक दिसत आहे या क्रमांकामधील दोन अक्षरे स्पष्ट दिसत नाही. ४.४७ वाजता दोन चोरटे उतरतात व मंदिराच्या लोखडी ग्रील वरून एक चोरटा आत मध्ये प्रवेश करून दानपेटी उचलून रिक्षात ठेवतो तर दुसरा चोरटा त्यांची मदत करीत असल्याचे दिसत आहे.रिक्षाच्या मागील बाजूस टप वर हर्सूल परिसरातील एका प्रतिष्ठित इंग्रजी शाळेचे नाव छापलेले आहे. दानपेटी चोरी केल्या नंतर दोघेही शहगंज च्या दिशेने सुसाट वेगाने पळाले.या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार चोरट्यानी या परिसराची मंदिराची पूर्ण माहिती घेतली असावी त्यानंतरच त्यांनी गुन्हा केला असावा व परिसरातच विक्रेत्याने माहिती पुरविली असावी शिवाय चोरटे हे छावणी भागातील असण्याची शक्यता आहे.
शिवसेना पदाधिकारी व्यस्त भाजपाचे पोलिसांना निवेदन
शिवसेनेच्या कोणत्याही कार्य हे बहुतांश वेळा आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या संस्थान गणपती च्या दर्शनानेच होत असते शिवसेनेचे खासदार चंद्रकांत असो वा इतर आमदार पदाधिकारी सर्वांचीच संस्थान गणपती वर असीम श्रद्धा आहे मात्र आज औरंगाबाद शहरात आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रम असल्याने मंदिरात चोरी होऊन देखील कोणीही पदाधिकारी मंदिर परिसरात फिरकला नाही.
या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यानि मंदि्र परिसरात गर्दी केली होती. व तातडीने चोरत्याना अटक करा अशी मागणी केली.या आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक शिनगारे यांना देण्यात आले या वेळी मंडल अध्यक्ष सुधीर नाईक, उपाधयक्ष योगेश अश्टेकर सुनील शरणागत सिद्धार्थ सालवे मंडल सर चिटनीस अक्षय बोरसे केदार ठाकरे आदींची उपस्तिथी होती.